Advertisement

Breaking News
Loading...

“रडायचं नाही, लढायचं” – माजी नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांची गर्जना...

 


सोलापूर शहर | हॅलो रिपोर्टर न्यूज : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने अनेक माजी नगरसेवकांना यंदाच्या निवडणुकीत संधी न दिल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक सुरेश अण्णा पाटील आणि माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पक्षाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे.



या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ठाम भूमिका मांडली. “रडायचं नाही, लढायचं” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी सांगितले की, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युती असल्यामुळे भाजपकडून संधी मिळाली नसली, तरी शिवसेना शिंदे गटाकडून आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत.


“मी काम करणारा नेता आहे. काम करणारा आणि न करणारा नेता जनता चांगल्या प्रकारे ओळखते. त्यामुळे संधी न मिळाल्याने रडत बसायचे नाही, तर जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढायची,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.


त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक राजकारण अधिक तापण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments