Advertisement

Breaking News
Loading...

औज मंद्रूप येथे वृक्षारोपण व आदर्श पोलीस पाटील-शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न...

 


औज मंद्रूप | दक्षिण सोलापूर तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे: समाजामध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे तसेच ग्रामीण भागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श पोलीस पाटील व गुणवंत शिक्षकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने वृक्षारोपण, आदर्श पोलीस पाटील व शिक्षक सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन आज शुक्रवार दि. ०३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता औज मंद्रूप येथे करण्यात आले.


सदर कार्यक्रम मा. श्री. अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच आदर्श पोलीस पाटील व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमास मा. श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग, सोलापूर ग्रामीण तसेच मा. श्री. राहुल आत्राम, परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक तसेच मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.


या कार्यक्रमाचे आयोजन श्री. अब्दुलकादर समशेर अली बडे जागीरदार, संस्थापक – जय हिंद एज्युकेशन फाउंडेशन तसेच अध्यक्ष – चॉईस कॉलेज ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड कॉमर्स, पुणे (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न) यांच्या वतीने करण्यात आले होते.


या सोहळ्यात पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ग्रामीण भागात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श पोलीस पाटील आणि शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


सदर कार्यक्रमास नागरिक, शिक्षक, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.





Post a Comment

0 Comments