मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी आरिफ नदाफ:
सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मंदूप जिल्हा परिषद गट क्रमांक 61 व मंदूप पंचायत समिती गण क्रमांक 121 साठी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सना कौसर महंम्मद शेख व अनंत जगन्नाथ म्हेत्रे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मंदूप येथील ग्रामदैवत मळसिद्धप्पा मंदिर येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व काँग्रेस पक्षप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी उमेदवारांकडून विकासात्मक दृष्टीकोन, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व भविष्यातील आराखडा मांडण्यात येणार असून, मतदारांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.
दरम्यान, गुरुवार दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करताना “हाताचा पंजा” या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

0 Comments