नरखेड | मोहोळ तालुका प्रतिनिधी: नरखेड जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. या गटातील बावीस गावांतील नागरिकांनी पुढील पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्यावी व भरघोस मतांनी विजयी करावे, अशी नम्र विनंती त्यांनी सर्व ग्रामस्थांना केली आहे.
नरखेड जिल्हा परिषद गटात एकुरके, बोपले, यलमवाडी, देगाव, वाळूज, भैरववाडी, मनगोळी, डिकसळ, मसले चौधरी, भोयरे, मलिकपेठ, दाईंगडेवाडी, खरकटने, घाटणे, हिंगणी निपाणी, भांबेवाडी, आष्टे, मोरवंची, खुनेश्वर, शिरापूर सो. आदी गावांचा समावेश आहे. या सर्व गावांचा सविस्तर दौरा अनिल आबाजी पाटील लवकरच करणार असून, ग्रामस्थांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न जाणून घेण्यावर त्यांचा भर राहणार आहे.
सामाजिक कार्य, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची भूमिका यामुळे त्यांना नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

0 Comments