भंडारकवठे | तालुका प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील जीवन विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, भंडारकवठे तालुका उपविभागीय अधिकारी (DySP) संकेत देवळेकर साहेब व IPS अधिकारी राहुल आत्राम साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीप्रसंगी त्यांनी युवकांशी संवाद साधत स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती तसेच क्रीडा क्षेत्रातील संधी व तयारीबाबत मौलिक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जीवन विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, भंडारकवठे येथील विद्यार्थी, युवा खेळाडू, पोलीस भरतीसाठी तयारी करणारे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गावातील सागर महादेवराव पाटील, सिध्देश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरचे संचालक प्रथमेश वसंतराव पाटील, अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूरचे सिनेट सदस्य एम. डी. कमळे सर, माजी पंचायत समिती सदस्य विठ्ठल पाटील, शेतकरी संघटनेचे भागवत बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी युवकांनी ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे आवाहन केले. या सदिच्छा भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये व युवकांमध्ये प्रेरणा निर्माण झाली असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


0 Comments