Advertisement

Breaking News
Loading...

हत्तुर जि.प. गटात शिवसेनेचा जोरदार प्रचार; होनमुर्गीत अमर पाटील यांची सभा...

 


होनमुर्गी | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ राजदत्त रासोलगीकर...

सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर हत्तुर जिल्हा परिषद गट (क्र. ६०) व औराद पंचायत समिती गण (क्र. १२०) मध्ये शिवसेनेच्या प्रचाराला वेग आला आहे. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ. लक्ष्मीबाई रतिकांत पाटील यांच्या समर्थनार्थ आज होनमुर्गी येथे भव्य प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते.



या सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख अमर रतिकांत पाटील यांनी मतदारांशी थेट संवाद साधत, शिवसेनेच्या विकासाभिमुख धोरणांची माहिती दिली. “धनुष्यबाण हे केवळ चिन्ह नाही, तर सामान्य जनतेच्या हक्कांचा आणि विकासाचा आवाज आहे,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.



हत्तुर जिल्हा परिषद गटासाठी अ.क्र. ३ – सौ. लक्ष्मीबाई रतिकांत पाटील तर औराद पंचायत समिती गणासाठी अ.क्र. ४ – परमेश्वर शिवराम शिंदे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार असून, दोघांनाही मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.



सभेदरम्यान उपस्थित नागरिकांना मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करत, धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून सौ. लक्ष्मीबाई रतिकांत पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

होनमुर्गीतील या सभेला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला-भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात “धनुष्यबाणाचा जयघोष” आणि विजयाचा विश्वास व्यक्त करणारे वातावरण पाहायला मिळाले.

Post a Comment

0 Comments