Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप येथे फोन न उचलल्याच्या कारणावरून संताप; पतीकडून पत्नीवर वीट-बांबूने हल्ला, पतीविरुद्ध मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे | दि. 29 मार्च 2026: मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीत घरगुती वादातून पतीने पत्नीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यास्मिन रफिक शेख (वय 32, रा. मुजाबा वस्ती, धानोरे, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती रफिक साहेबलाल शेख यांनी दि. 26 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे वाद घालत शिवीगाळ केली.

तसेच “तू फोन का उचलत नाहीस” या कारणावरून संतापून आरोपीने फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरातील वीट तसेच बांबूच्या सहाय्याने पाठीवर, डाव्या दंडावर व मांडीवर मारहाण करून जखमी केले, असे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गु.र. नं. 91/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 118(1), 351(2), 351(3), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद दि. 29 मार्च 2026 रोजी दुपारी 2:19 वाजता करण्यात आली असून मंद्रूप पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस नाईक मसलखांब हे करीत आहेत.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!

Post a Comment

0 Comments