सोलापूर ग्रामीण / हॅलो रिपोर्टर न्यूज / मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर / (दि. ०१ एप्रिल २०२६) – सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबिराचे दुसऱ्यांदा आयोजन करण्यात आले आहे.
हे आरोग्य शिबिर पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील संवाद हॉलमध्ये दि. ०१ एप्रिल ते ०३ एप्रिल २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले असून, पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या शिबिरामध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी, विविध आजारांबाबत मार्गदर्शन तसेच आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला जात आहे. सतत कर्तव्यावर कार्यरत असलेल्या पोलीस दलाच्या आरोग्याची जपणूक करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
शिबिराच्या उद्घाटनावेळी पुणे येथील तज्ज्ञ जयदीप मोघे यांनी उपस्थित राहून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. यावेळी राखीव पोलीस निरीक्षक तिलकचंद कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले.
या आरोग्य शिबिरास पोलीस दलाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी सुमारे १०० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. त्यामुळे पोलीस दलामध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मोठी मदत होत असून, हा उपक्रम सर्व स्तरातून कौतुकास्पद ठरत आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!



0 Comments