Advertisement

Breaking News
Loading...

खवणी येथे अवैध दारू वाहतुकीवर एलसीबीची धडक कारवाई 19 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त; तीन आरोपी ताब्यात...

 


सोलापूर ग्रामीण | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोहोळ तालुक्यातील खवणी येथे अवैध दारू वाहतुकीवर धडक कारवाई करत तब्बल 19 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मा. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण व मा. अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

दि. 08 मे 2026 रोजी सहायक पोलीस निरीक्षक श्री. अमित बाबर, पोलीस कॉन्स्टेबल हरिदास थोरात, घाडगे, दोरकर, शिंपाळे व चालक पोलीस कॉन्स्टेबल पवार हे मोहोळ पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मौजे खवणी येथील नागनाथ नर्सरीजवळ काही इसम विनापरवाना दारूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी तीन इसम एका वाहनातून दुसऱ्या वाहनात अवैध दारू उतरविताना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून धनराज अविनाश भोसले (रा. पोखरापूर, ता. मोहोळ), ज्ञानेश्वर धर्मा उन्हाळे (रा. पोखरापूर, ता. मोहोळ) व अमर मोहन गिड्डे (रा. मोडनिंब, ता. माढा) यांना ताब्यात घेतले.

आरोपींकडून देशी दारू “टॅंगो पंच” कंपनीचे 90 मिलीचे 77 बॉक्स, बोलेरो कॅम्पर, स्विफ्ट कार तसेच दोन मोटारसायकली असा एकूण 19 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments