मंगळवेढा | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मंगळवेढा तालुक्यात मोठी कारवाई करत 4 किलो 128 ग्रॅम गांजासह एका युवकास अटक केली आहे. ही कारवाई 9 मे 2026 रोजी माचनूर येथील उड्डाणपुलाजवळ करण्यात आली.


पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल देवकर यांना शाहूअली धावड हा युवक गांजा घेऊन येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी माचनूर उड्डाणपुलाजवळील सर्विस रोडवर सापळा रचला.

दुपारी सुमारे तीन वाजता संशयित युवक मोटरसायकलवरून येताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी तत्काळ त्याला पकडले. त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये 4 किलो 128 ग्रॅम गांजा आढळून आला.

या प्रकरणी शाहूअली धावड (रा. ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून गांजा, मोटरसायकल, मोबाईल व सॅक असा एकूण 1 लाख 27 हजार 660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपीने हा गांजा कुठून आणला याचा तपास पोलीस करत असून पुढील कारवाई सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!