सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील रहिवासी समीर कासिम शेख यांना शिक्षण क्षेत्रात तसेच सामाजिक ऐक्य, समावेशकता आणि शांततेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील “Honorary Doctorate in Education” हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
हा सन्मान “World Federation of the Arts, Literature, Education, Peace and Culture (FEMALPC)” या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून देण्यात आला असून, मानवतेची सेवा, विविधतेचा सन्मान आणि जागतिक शांततेसाठी केलेल्या योगदानाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली. या पुरस्कारामध्ये विशेषतः “Inclusion and Culture of Peace” या विषयावर त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
समीर शेख यांनी सामाजिक न्याय, बंधुता आणि समता यांसाठी सातत्याने प्रयत्न करत शिक्षण, कला आणि संस्कृती यांना एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्यामुळे समाजात एकात्मता आणि सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत झाली आहे.
हा सन्मान 31 जानेवारी 2026 रोजी पेरू प्रजासत्ताकात जाहीर करण्यात आला. या यशाबद्दल सोलापूर शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!


0 Comments