बोरामणी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : बोरामणी येथे मा. पंचायत समिती सदस्य श्री. धनेश आचलारे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान’ या भावनेतून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हे शिबिर उद्या गुरुवार, दि. १४ मे २०२६ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० या वेळेत विठ्ठल मंदिर, बोरामणी येथे होणार आहे. या माध्यमातून समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून जनसेवेत हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
“तुमचे रक्त, कोणाचे तरी प्राण वाचवेल” या संदेशातून समाजात रक्तदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, या उपक्रमात सहभागी होऊन सामाजिक कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन श्री. धनेश आचलारे व मित्र परिवार यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

0 Comments