सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत शिक्षणाधिकाऱ्यांवर बेछूट आरोप करून दबाव टाकल्याच्या प्रकरणात एका महिला शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला शिक्षिका सोमवारी सकाळी शिक्षणाधिकारी कार्यालयात आली होती. तिने मागील काही महिन्यांचा थकीत पगार तात्काळ देण्याची मागणी करत अधिकाऱ्यांवर दबाव टाकला. समजूत काढूनही तिचे काम त्वरित होऊ शकत नसल्याचे सांगितल्यावर तिने संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आणि मोबाईलवर चित्रीकरणही केले.
यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये उपस्थित असलेले काही शाळांचे संस्थाचालक, संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक यांनी देखील संबंधित महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केले असता ती महिला त्यांचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
या प्रकारामुळे शिक्षणाधिकारी जगताप यांनी तत्काळ पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन संबंधित शिक्षिकेला ताब्यात घेतले.
शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले की, “माझ्यावर विनाकारण आरोप करून शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला. मला धमकावण्याचाही प्रयत्न झाला; मात्र मी कोणतेही गैरकृत्य करणार नाही.”
दरम्यान, संबंधित महिला शिक्षिकेनेही आपली बाजू मांडताना सांगितले की, ती गेली अनेक वर्षे सेवेत असून तिचा पगार थकीत आहे आणि त्यासाठीच ती पाठपुरावा करत आहे.
या घटनेची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!
.jpeg)
0 Comments