Advertisement

Breaking News
Loading...

सोलापुरातील ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे निधन; साहित्यविश्वात शोककळा...


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज |मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : सोलापूर शहरातील ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे बुधवार, दिनांक ६ मे २०२६ रोजी पहाटे चार वाजता त्यांच्या निवासस्थानी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सोलापूरच्या साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.

कवी माधव पवार यांनी आपल्या साहित्यसेवेतून अनेक नवोदित कवी-कवयित्रींना घडवले. विविध कवी संमेलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांना व्यासपीठ मिळाले, ही त्यांची मोठी देणगी मानली जाते.

त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. ६ मे २०२६ रोजी दुपारी ४ वाजता त्यांच्या निर्मिती टॉवर्स, मोदीखाना, सोलापूर येथील राहत्या घरापासून निघणार असून, मोदी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या निधनाने सोलापूरच्या सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.


 आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!


Post a Comment

0 Comments