सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. 7 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, दिल्ली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET – फेब्रुवारी 2026) मध्ये सोलापूरच्या मा. निर्मला लक्ष्मण मौळे मॅडम यांनी पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या सोलापूर शहर महिला प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या निर्मला मौळे यांनी पेपर-1 (इयत्ता 1 ली ते 5 वी) तसेच पेपर-2 (इयत्ता 6 वी ते 8 वी) या दोन्ही परीक्षांमध्ये पात्रता मिळवली आहे. त्यांनी पेपर-1 मध्ये 150 पैकी 89 गुण, तर पेपर-2 मध्ये 150 पैकी 82 गुण मिळवत यश संपादन केले.
ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात आली होती. निकाल 30 मार्च 2026 रोजी जाहीर झाला असून, त्यांचे पात्रता प्रमाणपत्र नुकतेच जारी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोणत्याही अतिरिक्त प्रयत्नांशिवाय पहिल्याच संधीमध्ये हे यश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
निर्मला मौळे यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून, “यशवंत व्हा… गुणवंत व्हा… राष्ट्रीय कीर्तीच्या शिक्षिका व्हा…” अशा शब्दांत त्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यांच्या या यशामुळे शिक्षक भरतीसाठी तयारी करणाऱ्या अनेक महिला व युवकांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!


0 Comments