मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | निंबर्गी गावचे सुपुत्र, अभ्यासू, कर्तृत्ववान, लोकाभिमुख, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होणारे, महादेव कोळी समाजाचे खंबीर व प्रभावी नेतृत्व करणारे, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, आपल्या ओघवत्या व प्रभावी वक्तृत्वाने जनमानसात वेगळी ओळख निर्माण करणारे बाळासाहेब कोळी यांची शिक्षक सेना, मोहोळ तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने निंबर्गी गावासह संपूर्ण मोहोळ तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बाळासाहेब कोळी यांनी अनेक वर्षे निस्वार्थ भावनेने सामाजिक कार्य करत सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. गावातील विकासकामे, विद्युत रोषणाई, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि युवकांना संघटित करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय मानले जाते. अडीअडचणीच्या वेळी एका हाकेत धावून जाणारे, सर्वांना आपलेसे वाटणारे आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याने वागणारे नेतृत्व म्हणून त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे.
"एक कॉल... प्रॉब्लेम सॉल्व्ह" हे त्यांचे ब्रीदवाक्य त्यांच्या कार्यशैलीचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या या निवडीमुळे युवा वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असून, समाजकारण आणि संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या निवडीबद्दल गोडबोले विद्यालय,कामती शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग, महादेव कोळी समाज संघटना (सोलापूर), उद्योजक सोमा बिराजदार, भारत साहेब, पंचायत समिती सदस्य शिशिकांत दुपारगुडे, सिद्धाराम हत्ताळी, दत्ता कोळी, लायप्पा कोळी, विश्वनाथ कोळी, मौलाली, शिरगोंडे पुटू, रामा वरंगटी, बसू शिवशरण, रणजित दुपारगुडे, अजित दुपारगुडे, अप्पासाहेब गुरव,अजय गुरव,सागर पाटील,पैंगबर मुल्ला, शिवशंकर बोरगी, शिवाजी धारेराव, श्रीशैल अंकलगी तसेच निंबर्गी ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.






0 Comments