सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेतील फौजदार म. इसाक उर्फ ख्वाजा मुजावर यांनी लोकशासन आंदोलन पार्टीचे मारुती जाधव आणि राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध विशेष दिवाणी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याबाबत ॲड. प्रवीण शेंडे यांनी अधिकृत माहिती दिली.
दाव्यानुसार, ८ जून २०२६ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत तसेच १० जून रोजी पुनम गेट येथे झालेल्या आंदोलनादरम्यान फौजदार मुजावर यांच्याविषयी खोटे व बदनामीकारक आरोप करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या कथित आरोपांमुळे प्रतिमा आणि प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचे दाव्यात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी विशेष दिवाणी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला असून, फिर्यादीच्या वतीने ॲड. प्रवीण शेंडे काम पाहत आहेत. याशिवाय संबंधित घटनेबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हाही नोंद असल्याचे सांगण्यात आले.
टीप : या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, दाव्यातील आरोपांवर न्यायालयाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे संबंधित सर्व आरोप हे दाव्यातील म्हणणे असून त्याबाबतचा अंतिम निष्कर्ष न्यायालयाकडून येणे बाकी आहे.


0 Comments