Advertisement

Breaking News
Loading...

पर्यावरणपूरक प्रवासाला नवी दिशा! जनसेवक महादेव कोगनुरे यांच्या लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या YO BYKES शोरूमचे दिमाखदार उद्घाटन...


 

सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |

पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने जनसेवक श्री. महादेव कोगनुरे यांच्या लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या YO BYKES इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमचे दिमाखदार उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.





सोलापूरचे माजी खासदार तथा मार्गदर्शक डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते शोरूमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकासासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे वाढते महत्त्व अधोरेखित करत लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या या नव्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.








कार्यक्रमास श्री. महादेव कोगनुरे यांच्यासह त्यांचे सहपरिवार, नातेवाईक, सागर सिमेंटचे अधिकारी, अतिथी प्युअर व्हेजचे कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर, हितचिंतक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


इलेक्ट्रिक वाहनांना वाढती पसंती

वाढत्या इंधनदरांच्या पार्श्वभूमीवर कमी खर्च, अत्यल्प देखभाल आणि प्रदूषणमुक्त प्रवास यामुळे इलेक्ट्रिक दुचाकींकडे नागरिकांचा कल वाढत आहे. या पार्श्वभूमीवर YO BYKESच्या माध्यमातून ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसचे सर्वेसर्वा श्री. महादेव कोगनुरे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “या नव्या व्यवसायात काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या उपक्रमासाठी मला विश्वासाने संधी दिल्याबद्दल कंपनीचे तसेच विशेषतः सिमेंट क्षेत्रातील आमचे मार्गदर्शक आणि YO BYKESचे सोलापूर जिल्हा वितरक श्री. बाळासाहेब मुंदडा यांचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.”

“त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सहकार्यामुळे हा उपक्रम साकार झाला असून ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी लक्ष्मीकांत एंटरप्राईजेसच्या नव्या उपक्रमाचे कौतुक करत शोरूमच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



Post a Comment

0 Comments