Advertisement

Breaking News
Loading...

विचारवंतांप्रमाणे आचारवंत असणेही गरजेचे- प्रा डॉ खेडकर...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |

शिक्षण हा समाजसुधारणेचा पाया आहे. शिक्षणातून अनेक पिढ्या घडतात, व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. वाचनातून माणूस विचारसमृद्ध होतो. स्व. दी. शि. कमळे गुरूजी विचारवंत होते तसे आचारवंतही होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचा विकास साधला, असे प्रतिपादन सोलापूर येथील प्रसिद्ध वक्ते प्रा. डॉ. यशपाल खेडकर यांनी केले. ते मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सांगता संमारंभात  बोलत होते. अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा समाजसेवा मंडळ या संस्थेचे अध्यक्ष पी. एल. कोळी होते. या वेळी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत  नरेश बदनोरे, संस्थेचे सचिव एम. डी. कमळे, खजिनदार प्रा. व्ही. के. पाटील, विश्वस्त नागेश बिराजदार, प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी प्रा. डॉ. खेडकर म्हणाले, व्यक्तिमत्त्व विकासात सेवाभाव महत्त्वाचा असतो. युवकांनी शिक्षणातून संस्कारक्षम व्हावे, त्यातून सेवाभाव जपला पाहिजे. शिक्षण हाच विकासाचा पाया आहे.

यावेळी विचारवंत नरेश बदनोरे म्हणाले, नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. नवनवीन पुस्तके वाचून यशाची शिखरं गाठली पाहिजेत. तरुणांनी सत्तेच्या विरोधात क्रांतीची हाक दिली. त्यात यशही मिळाले. 

अध्यक्षस्थानावरून बोलताना पी. एल. कोळी म्हणाले, स्व. दी. शि. कमळे गुरुजी यांनी तालुक्यातील मुलींना उच्च शिक्षण मिळावे, यासाठी महाविद्यालयाची स्थापना केली. महाविद्यालय २५ वर्षांचे झाले. या काळात महाविद्यालयाने साधलेली प्रगती उल्लेखनीय आहे. आज महाविद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी विद्यापीठाचे सुवर्णपदक पटकावले आहे, हे स्व. कमळे गुरुजींचे स्वप्न साकार होताना दिसत आहे. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप यांनी केले. प्रा.डॉ. ए. बी. तांबोळी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. जवाहर मोरे यांनी आभार मानले.



Post a Comment

0 Comments