Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर गदा; DYSP गणेश शिंदे यांनी घेतला पदभार... अवैध धंदे पूर्णतः बंद करण्याचा निर्धार; वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रमांवर भर...


 मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी आरिफ नदाफ |

मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी आता पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार मंद्रूप हद्दीतील अवैध धंदे पूर्णतः बंद करण्यासाठी प्रभावी पावले उचलली जाणार असल्याची माहिती नवनियुक्त DYSP गणेश शिंदे यांनी दिली.

मंद्रूप पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहणार नाहीत. अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर तसेच त्यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींना प्राधान्य दिले जाणार आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी आपल्या अडचणी किंवा समस्या कोणतीही भीती न बाळगता थेट पोलीस ठाण्यात येऊन मांडाव्यात. नागरिकांच्या समस्यांचे नियमानुसार निराकरण करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबविण्यावरही भर दिला जाणार असल्याचे गणेश शिंदे यांनी सांगितले. पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था, अवैध धंद्यांवर नियंत्रण, नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण आणि सामाजिक उपक्रम या सर्वच बाबींवर आगामी काळात पोलीस प्रशासनाचा विशेष भर राहणार असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.


Post a Comment

0 Comments