Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

व्ही.आर.पवार साडीच्या दुकानात वीजेची चोरी



पहा काय आहे प्रकरण....




सोलापुरातील नामांकित साडीचे दुकान असणाऱ्या व्यापाऱ्याने विद्युत चोरी केल्याची घटना उघडली आहे. याबाबत संबंधित व्यापाऱ्याला महावितरण कडून दंडाची नोटीस देखील पाठवण्यात आली आहे.


सोलापूर शहर जिल्ह्यातील साडीचे मोठे व्यापारी म्हणून व्ही आर पवार हे परिचित आहेत.त्यांच्याच साडीच्या दुकानांमध्ये विद्युत चोरी करण्यात आल्याची घटना घडली आहे.याबाबत महावितरण कडून राजेश रमेश पवार राहणार मंगळवार पेठ सोलापूर यांना 1 लाख 63 हजार 420 रुपये दंडाची नोटीस पाठवण्यात आली आहे.


सोलापूर शहरामध्ये असे अनेक व्यापारी आहेत.जे विद्युत बिल कमी येण्यासाठी मीटर मध्ये छेडछाड करून विदधूत चोरी करतात.दिवाळी सणाच्या तोंडावर तर लाखो रुपयांच्या विद्युत चोरीच्या घटना सोलापूर शहरात घडत असतात.विविध फॅक्टरीतून आणलेल्या साध्या कपड्यांवर ब्रॅण्डेड कंपनीचे स्टिकर मारून मोठ्या किमतीत कपडे विकण्याचे काही व्यापाऱ्यांचे रॅकेट आहे.हे संबंधित व्यापारी मोठमोठ्या अधिनकाऱ्यांकडे बस उठ करत असल्याने आणि त्यांना खुश ठेवत असल्याने त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही अशी त्यांची धारणा झाली आहे.मात्र व्ही आर पवार सारख्या मोठ्या व्यापाऱ्यावर इमानदार विधुतवितरण सारखा विभाग कारवाई करत असेल तर बांधकाम बिल्डर म्हणून महापालिकेचा बेकायदा नाल्यावर बांधकाम करणाऱ्या आशा ब्रँडेड कंपनीचे लोगो चिटकवून स्वस्तातील कपडे ब्रांडेड म्हणून विकणाऱ्या आशा धेंड्यांवर भविष्यात कारवाई होईल याची आशा बाळगूयात.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments