Advertisement

Breaking News
Loading...

तेलगाव नदीच्या पुलावर दुचाकी घसरून पडलेल्या मनगोळीच्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू

 सोलापूरहून मनगोळी गावाकडे दुचाकीवरून निघालेला अल्लाउद्दीन अमीन शेख (वय वर्षे ३६,रा.मनगोळी,ता.द.सोलापूर) हा तरुण तेलगाव नदीवरील पुलावर दुचाकी त्याचा क्रमांक एमएच १३ एव्ही ६९३४ यावरुन घसरुन पडल्याने जखमी झाला.यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला.सोमवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.त्याला उपचारासाठी भाऊ मेहबूब शेख याने सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले.त्याच्यावर उपचार सुरू असताना तो मृत पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.सदर घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments