Advertisement

Breaking News
Loading...

माळकवठा ते निम्बर्गी रोडवर चालकाचा ताबा सुटल्याने छोटा हत्ती वाहन पलटी झाल्याने २० ते २५ महिला जखमी, चालक घटनास्थळावरुन फरार

माळकवठाहून निम्बर्गी गावाकडे निघालेला महिंद्रा मॅक्सिमो छोटा हत्ती वाहन त्याचा क्रमांक एमएच 13 डीक्यू 2038 या वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने सदर वाहन पलटी झाली.ही घटना ३ सप्टेबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.या वाहनामध्ये २० ते २५ महिला कामगार होत्या.सदर वाहन पलटी झाल्याने यातील सर्व महिला जखमी झाल्या आहेत.या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.घटनास्थळावरुन चालक फरार झाला आहे.जखमी महिलांना मंद्रूप येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून ४ ते ५ महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मंद्रूप पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments