Advertisement

Breaking News
Loading...

गुंजेगांव येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगांव येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाले.आमदार सुभाष देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून 2 कोटी 75 लक्ष रुपयांचा गुंजेगाव -कंदलगाव रस्ता,1 कोटी 50 लक्ष रुपये किंमतीचा 33/11 गुंजेगाव उपकेंद्र

अति ट्रान्सफार्मर शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आमदार सुभाष देशमुख,नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर चनगोंडा हवीनाळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आमदार सुभाष देशमुख यावेळी बोलताना म्हणाले गुंजेगावाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी तसेच शैक्षणिक दृष्ट्या गुंजेगावाला पुढे नेण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे ते म्हणाले.


यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आप्पासाहेब पाटील,सरपंच सफलता प्रभाकर पाटील,सरपंच प्रतिनिधी प्रभाकर भैय्या पाटील,उपसरपंच तुकाराम भडकुंबे,ग्रामपंचायत सदस्य संतोष मोटे,वर्षा भडकुंबे,शंकर पवार,अंजना जाधव,किरण आठवले,पार्वती जाधव,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष पवार,अमोल गुंड,बाळासाहेब पाटील,किशोर कुलकर्णी,अंगद पवार,सिद्राम पवार,दत्तात्रय पाटील,शशिकांत पवार,सज्जनराव पाटील,बालाजी पवार,जयराम पवार,राम साळुंके,बापू जाधव,सत्यवान भडकुंबे,निवृत्ती मुरडे,अमरजित ननवरे,निलेश पाटील,रोहित पाटील,विशाल पाटील,तुषार पाटील,पृथ्वीराज पाटील,सुरज पाटील,दत्तात्रय पवार यांच्यासह गुंजेगाव येथील ग्रामस्थ बहुसंख्येंने उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments