Advertisement

Breaking News
Loading...

मनगोळीचे माजी सरपंच सुरेश दादा घंटे यांचा अपघाती मृत्यू

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळीचे माजी सरपंच सुरेश दादा घंटे (वय वर्षे 72) यांचा सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला.ते पंढरपुरहून मंगळवेढ्याकडे दुचाकीवरुन येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.त्यांची अंत्ययात्रा मंगळवार,दिनांक 12 सष्टेंबर 2023 रोजी मनगोळी येथील राहत्या घरापासून सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,दोन सुना,नातवंडे असा परिवार आहे.



Post a Comment

0 Comments