Advertisement

Breaking News
Loading...

कुंभारी बायपास रोडवर ब्रिजला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी ते साखर कारखाना बायपास रोडवर बांधकाम सुरू असलेल्या ब्रिजला दुचाकीसह धडकल्याने प्रशांत गुड्डप्पा गणगोडा (वय वर्षे 23),राहणार नागणसूर,तालुका अक्कलकोट या तरुणाचा मृत्यू झाला.ही घटना 12 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघातात प्रशांत यांच्या डोक्याला,तोंडाला तसेच सर्वांगास मुकामार लागल्याने त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कटके यांनी यादीसह सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments