Advertisement

Breaking News
Loading...

सादेपूर येथे मावा बनविणारे जेरबंद

दक्षिण सोलापूर तालुक्यातील सादेपूर येथे




दिनांक 10 सप्टेबर 2023 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बाशासाब मजलेसाब नदाफ,वय 21 वर्षे,विकास सावळा वाघ,वय 20 वर्षे,बाबूलाल राजासाब नदाफ,वय 28 वर्षे,सर्वजण राहणार वडार गल्ली,ता.चडचण,जि.विजापूर यांनी मावा बनविण्यासाठी सुगंधित तंबाखू आदी प्रतिबंधित पदार्थ,बारीक कच्ची सुपारी व चुना आदीचा साठा करून मावा बनविण्याचे मशीन असे एकूण प्रतिबंधित अन्न पदार्थाचे एकूण 6 हजार 305 रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.तसेच मावा बनविण्याचे अंदाजे 40 हजार रुपये किंमतीचे मशीन जवळ बाळगून महाराष्ट्र शासनाच्या वतीने अन्न सुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये केलेल्या प्रतिबंधित पानमसाला,सुगंधित

तंबाखू या अन्न पदार्थांची विक्री करण्याच्या हेतूने साठा करून सदर आरोपींनी अन्न सुरक्षा आयुक्त,महाराष्ट्र राज्य या लोकसेवकाने जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून काढलेला आदेश डावलल्यामुळे तिन्ही आरोपीं विरुध्द मंद्रूप पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास ग्रेड पीएसआय बिराजदार हे करीत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments