Advertisement

Breaking News
Loading...

6 जणांनी मिळून दगडाने केली मारहाण



दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील रहिवासी अमोल सुनील चव्हाण (वय वर्षे 21) याला दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सुनील नगर येथे मागील भांडणाच्या रागातून अज्ञात 6 जणांनी मिळून दगड आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली.या मारहाणीत डोक्याला मार लागून जखम झाल्याने उपचारासाठी मित्र ओंकार याने मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले.रुग्ण शुध्दीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments