Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

रिक्षाचालकास तिघांंकडून तलवार आणि रॉडने मारहाण

दक्षिण सोलापूर तालुक्यातील रिक्षाच्या भाड्यावरून एका रिक्षाचालकास तिघांनी मिळून तलवार आणि रॉडने मारहाण केल्याप्रकरणी जखमी अवस्थेत रिक्षाचालकास सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.ही घटना दिनांक १८ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ तीस वाजण्याच्या सुमारास होटगी गाव येथे घडली आहे.मयूर सौरप्पा गायकवाड वय वर्षे २३ (रा.होटगी गाव,तालुका दक्षिण सोलापूर) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाने नाव आहे.होटगी गाव येथील झोपडपट्टी येथे रिक्षाच्या भाड्यावरून रिक्षा चालकास लक्ष्मण गायकवाड,रोहित गायकवाड,हृतिक गायकवाड,कुमार जाधव व रोहित जाधव या सर्वानी मिळून मयूर सौरप्पा गायकवाड याला तलवारीने व रॉडने मारहाण केल्याने जखमी अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचारासाठी वडील सौरप्पा गायकवाड यांनी दाखल केले आहे.रुग्ण शुध्दीवर असून या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकी येथे झाल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments