Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांची कोगनुरे यांच्या निवासस्था सदिच्छा भेट

महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा राज्य मंत्री शेखर मुंदडा यांनी आज रविवारी एम के फाउंडेशनचे संस्थापक व सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनुरे यांच्या विजापूर रोडवरील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.


माजी मंत्री शेखर मुंदडा आज सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी संस्थापक महादेव कोगनुरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन गोमातेची पूजा करून सहभोजन केले.


"फार पूर्वीपासूनच महादेव कोगनुरे व एम के फाउंडेशनच्या कार्याची माहिती होती,महादेव कोगनुरे हे समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करत आहेत,त्यांच्या या निस्वार्थ कामाची पावती भविष्यात त्यांना नक्कीच मिळेल,त्यांचे कार्य सर्वांसाठी आदर्शवत आहे,असे उद्गार शेखर मुंदडा यांनी काढले व महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या स्थापनेचे उद्दिष्ट व भविष्यातील योजनांबद्दल त्यांनी यावेळी माहिती दिली.कोगनुरे परिवाराकडून मिळालेल्या आदरतिथ्याबद्दल आभार व्यक्त केले.


याप्रसंगी एम के फाउंडेशनचे सर्व संचालक,सदस्य,कोगनुरे परिवारातील सर्व सदस्य व मित्रपरिवार उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments