Advertisement

Breaking News
Loading...

"सोलापूरचे नूतन जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांचा बहुजन शिक्षक महासंघातर्फे सत्कार..."


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |

सोलापूरचे नूतन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था तथा सावकारांचे जिल्हा निबंधक श्री. मुकुंद पवार यांचा महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघ आणि बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर यांचे वतीने आज पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा बहुजन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड ,तसेच महासंघाचे पदाधिकारी डॉ राजदत्त रासोलगीकर,मुख्याध्यापक श्रीशैल गुरव, राजू अखंडेकर, चंद्रमणी वाघमारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

नूतन जिल्हा उपनिबंधक म्हणून मुकुंद पवार यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. 

यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील प्रशासकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सहकार क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न, तसेच शिक्षक व कर्मचारी वर्गाच्या विविध प्रशासकीय अडचणींबाबत यावेळी सकारात्मक संवाद साधण्यात आला.

सहकार क्षेत्रातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि सर्वसामान्यांच्या हिताचे व्हावे, अशी अपेक्षा पतसंस्थेच्या आणि महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments