Advertisement

Breaking News
Loading...

मंद्रूपचा कुस्तीपटू शुभम कारंजेची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

 मंद्रूप येथील लोकसेवा हायस्कुलचा कुस्तीपटू शुभम कारंजे याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड


कर्मयोगी कुस्ती प्रशिक्षण केंद्र,मु.पो.पारगाव.ता.दौड.जि पुणे येथे झालेल्या विभागीय स्तरी ग्रीको कुस्ती स्पर्धा 2023 मध्ये मंद्रूप येथील लोकसेवा हायस्कुलचा कुस्तीपटू शुभम गणेश कारंजे हा 19 वर्षे वयोगटात ग्रीको प्रकारातील 60 किलो वजनी गटात मुलांमध्ये अंतिम सामन्यात विजयी होऊन सवर्ण पदक मिळवला आहे.त्याचे राज्यस्तरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या कुस्तीपटूला क्रीडा शिक्षक नागनाथ धनाळे,शिवपुत्र म्हेत्रे,प्रा.विश्वनाथ घाटे आदींनी मार्गदर्शन केले.या यशस्वी खेळाडूचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिवशरण पाटील,सचिव तथा माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे,सहसचिव आप्पासाहेब म्हेत्रे,मुख्याध्यापक श्रीधर टेळे,पर्यवेक्षक मदगोंडा मलकारी,समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले



.

Post a Comment

0 Comments