Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कुंभारी येथे दुचाकीस्वाराला गंभीर जखमी करणार्‍या अज्ञात आयशर चालकावर गुन्हा दाखल

फिर्यादी महीबूब मुलका शेख (वय 68),रा.लिंबीचिंचोळी,ता.द.सोलापू यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीचा मुलगा जमीर महिबूब शेख हा फिर्यादीचा पुतण्या अस्लम याची हिरो कंपनीची एचएफ डिलेक्स त्याचा क्र.एमएच 13 ईए 9286 या गाडीवर सोलापुर येथील लग्नासाठी गेले होते.दि.9 जुन 2023 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीचा मुलगा जमीर हा लग्न कार्य संपवुन सोलापुरहून लिंबीचिंचोळीकडे येताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील टाटा शोरुम ते पेट्रोलपंप दरम्यान पाठीमागुन येणारी आयशर टेम्पो त्याचा क्र.एमएच 13 डीक्यू 1006 या टेम्पो वरील अज्ञात चालकाने भरधाव वेगात येवुन पाठिमागुन धडक दिले.यात फिर्यादीचा मुलगा जमीर याच्या दोन्ही पायाचे हाडे मोडुन,डोक्याला आणि पाठीला गंभीर जखमी करुन त्याच्या ताब्यातील मोटारसायकलचे आठ ते दहा हजार रुपयांचे नुकसान करुन फरार झाला आहे.


फिर्याद देण्याची आम्हाला कल्पना नसल्याने फिर्याद देण्यासाठी आमच्याकडूनच उशिर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


म्हणून अज्ञात आयशर टेम्पो चालकाविरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार कुंवर हे करीत असल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी



सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments