Advertisement

Breaking News
Loading...

तलाठी जोडमोटे आणि जाधव यांच्या पदोन्नतीबद्दल तहसीलदार लिंबारे यांच्या हस्ते सत्कार

दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूरचे तलाठी सूर्यकांत जोडमोटे तसेच टाकळीचे तलाठी प्रदीप जाधव या दोघांची मंडल अधिकारी या पदावर पदोन्नती झाल्याने त्यांचा मंद्रूप अप्पर तहसिल कार्यालयात अपर तहसीलदार राजशेखर लिंबारे यांच्या हस्ते यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.तलाठी सूर्यकांत जोडमोटे यांची नागणसूर येथे तर तलाठी प्रदीप जाधव यांची दूधनी येथे आणि मंद्रूप तहसीलचे महसूल सहायक दीपक कसबे यांची माढा तहसील येथे अव्वल कारकून म्हणून पदोन्नती झाली आहे.यावेळी बोलताना अप्पर तहसिलदार राजशेखर लिंबारे म्हणाले,तलाठी जोडमोटे,जाधव आणि अव्वल कारकून कसबे यांनी नागरिकांची आणि शेतकऱ्यांची उत्तम सेवा केली आहे.असेच कार्य यापुढील काळात देखील त्यांच्या हातून घडावे,अशा शुभेच्छा त्यांना दिल्या.यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे,मंडल अधिकारी ज्योतिबा पवार,महादेव स्वामी,दौला घोटाळे,रावसाहेब कोकरे,महसूल सहायक मळसिद्ध जडगे यांच्यासह तहसिलचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments