Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नांदणी टोलनाक्याजवळ भरधाव वेगातील डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

७ ऑक्टो



बर २०२३ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर-विजयपूर रस्त्यावर नांदणी टोलनाकादरम्यान भरधाव वेगात निघालेल्या डंपरने दुचाकीला धडक दिली.या धडकेत एक जण जखमी तर एक जण जागीच ठार झाला आहे.याबाबत दि.११ ऑक्टोबर २०२३ रोजी डंपर चालकाविरुध्द मंद्रुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नासर शेख (वय ३२, रा.बेगम पेठ,सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार डंपर त्याचा क्रमांक (केए २८ एए ०७७६) च्या चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत मंद्रूप पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,दि.७ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सोलापूर-विजयपूर रस्त्यावर नांदणी टोलनाकादरम्यान हायवा /डंपर त्याचा क्रमांक (केए २८,एए ०७७६) चालकाने भरधाव वेगात डंपर चालवून मोटारसायकलला त्याचा क्रमांक एमएच १३ डी डब्ल्यू ३७९७ ला पाठीमागून धडक दिली.या धडकेत दुचाकीस्वार अंबादास राम जाधव (वय ४८,रा.सेंटलमेंट फ्री कॉलनी,सोलापूर) हा गंभीर जखमी झाला असून फिर्यादीचा मेहुणा शकील कय्युम शेख (वय ३५,रा.लिमयेवाडी,ता.सोलापूर) यांना छातीवर,पायाला जोरात मार लागून जखमी होऊन उपचारापूर्वी मयत झाला आहे.


अपघातानंतर डंपरचालकाने अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना कळविण्याऐवजी पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या अपघाताची नोंद मंद्रुप पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक काशीद हे करीत असल्याची माहिती शुक्रवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments