Advertisement

Breaking News
Loading...

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या ५ जणांना उळेजवळ पकडले

दक्षिण सालापूर तालुक्यातील उळेजवळ दरोडा टाकण्याच्या तयारीने निघालेल्या ५ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले असून १३ जणांवर गुन्हा

दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत पोलिसांनी साडेपाच लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.शहरातील एका बँकेच्या लुटीचा त्यांचा प्रयत्न होता,अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.याप्रकरणी राज बहादूर कामी (वय २३,रा.अंबाली अंधेरी वेस्ट,मुंबई),दीपक बहादूर दिल्ली जमाई (वय २३,रा.आंबोली, मुंबई),मूरसलीम शेख (वय ३४), नामूल शेख (१९, दोघेही रा.झारखंड),सूरज नजीर उल हक (वय ३४,रा.पश्चिम बंगाल),मोहम्मद शेख (वय ३४),कमलुद्दीन शहाजूल(वय २३),इंदा मुलक शेख (वय ४५),भीम विश्वकर्मा (वय ३४),शिवसिंग देवल (वय ३४),टिकाराम गौरव कोली (वय ३४),विक्रमसिंह नेगी (वय ३४),भरसाऊथ अर्कसाऊथ (वय ४५) या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहरातील बँक लुटण्यासाठी उदगीर,लातूर व पुण्यातील (मूळचे नेपाळ व आसाम येथील) अट्टल दरोडेखोर सोलापुरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती,त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली.


याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.संशयित आरोपी हे एमएच ०६ डब्ल्यू ५१०० या वाहनातून दरोडा टाकण्यासाठी जात असताना कापडी सॅक,लोखंडी पाना,स्क्रू ड्रायव्हर,कटर,हातोडा,वायर

रिंग पाना,लोखंडी प्लग,कटर,पट्टी पाना,स्प्रे बाटली,नायलॉन दोरी,गॅस रेग्युलेटर,नोजल,मीटर काटे,ऑक्सिजन सिलिंडर,बारदाना,लोखंडी पाते असलेला चाकू,ऊसतोडीचे कोयते,लोखंडी पहार,पितळी गॅस गन कटर,गॅस पाइप,चार चाकी गाडी,सहा ते सात मोबाइल असा एकूण ५ लाख ६८ हजार ६७० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक इज्जपवार हे करीत आहेत.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments