Advertisement

Breaking News
Loading...

शिरपनहळ्ळी येथे एकाला चौघांनी मिळून लोखंडी राॅडने केली मारहाण



फिर्यादी अश्विनी भैरवनाथ बिराजदार (वय वर्षे 32),शिरपणहळी,ता.द.सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दि.22 आँक्टोबर 2023 रोजी सकाळी 10/45 वाजण्याच्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिवशक्ती मंदीराजवळ,शिरपनहळळी,ता.द.सोलापूर येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम पाहण्यासाठी ठेकेदार आले होते.त्यावेळी आरोपी प्रथमेश केदार कारणे,मेघराज सूर्यकांत बिराजदार,कृष्णात सिध्दाराम बिराजदार,लक्ष्मण सूर्यकांत बिराजदार सर्वजण रा.शिरपनहळ्ळी,ता.द.सोलापूर यानी तुम्ही काम कोणाला विचारून करता?कामाची पैसे आम्हाला भेटले पाहीजे असे म्हणुन शिवीगाळी दमदाटी करून फिर्यादीला ढकलून दिले.तसेच फिर्यादीच्या पतीला लोखंडी रॉडने,लाकडाने आणि कु-हाडीने मारहाण केली आहे.म्हणून सर्व आरोपींविरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पो.ना.बंदीछोडे हे करीत असल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

 दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments