Advertisement

Breaking News
Loading...

खवणी येथे पाणी भरण्याच्या कारणावरुन एकाला केबल वायरसह लाथाबुक्क्याने मारहाण

फिर्यादी महादेव भैरवनाथ काशीद (वय 33),राहणार खवणी,तालुका मोहोळ यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 21आँक्टोबर 2023 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या सामायिक विहिरीवर इलेक्ट्रिक मोटार चालू करून घराजवळ असलेल्या नळाजवळ पाणी भरत होते.त्यावेळी फिर्यादीचा चुलता रामदास हरिश्चंद्र काशीद,उत्तरेश्वर हरिश्चंद्र काशीद,चेतन उत्तरेश्वर

काशीद हे सर्वजण फिर्यादीच्या घराजवळ पाणी भरत असलेल्या ठिकाणी येऊन आज विहिरीवर आमची पाण्याची पाळी असून तू मोटार का चालू केली असे म्हणून शिवीगाळ करू लागले.त्यावेळेस रामदास काशीद यांनी त्याच्या हातात असलेल्या केबल वायरने फिर्यादीच्या पाठीत मारहाण करण्यास सुरु केले.फिर्यादी त्याला मारू नका असे म्हणाले असता चेतन काशीद याने त्याच्या हातातील काठीने पाठीवर हाताने दंडावर मारहाण करून जखमी केले.उत्तरेश्वर काशीद यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.तू परत सामायिक विहिरीवर मोटार चालू करायला कसा येतो हे आम्ही बघतो,असे म्हणून शिवीगाळ करू लागले.म्हणून चारही आरोपींविरुध्द वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण हे करीत असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments