Advertisement

Breaking News
Loading...

छोटा हत्ती टेम्पोच्या धडकेत एका ५४ वर्षीय इसमाचा मृत्यू

दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव-मंद्रूप रस्त्यावर

झालेल्या अपघातात मंद्रूप येथील एका ५४ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.ही घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.दिगंबर शिवाजी नवले (वय वर्षे ५४) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.नवले यांची येळेगाव रस्त्यावर शेती आहे.ते शेतावरून मंद्रूपकडील आपल्या घराकडे येत असताना प्रभाकर टेळे यांच्या वस्तीजवळ ते नैसर्गिक विधीसाठी थांबले होते.येळेगावकडे जाणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोने त्यांना जोरात धडक दिली.या धडकेत ते रस्त्यावर जोरात आपटल्याने त्यांच्या डोक्यात जबर मार लागून ते गंभीर जखमी झाले.त्यांना नातेवाईकांकडून उपचारासाठी मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले,अशी माहिती त्यांच्या नातेवाइकांनी पत्रकारांशी बोलताना दिली.या घटनेची नोंद मंद्रूप ग्रामीण रुग्णालयात झाल्याची माहिती बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments