Advertisement

Breaking News
Loading...

उळे गावाजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत तरुण दुचाकीस्वार गंभीर जखमी



सोलापूर-तुळजापूर रोडवरील उळे गावाजवळ भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीस्वारास जोराची धडक दिली.या धडकेत वीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता घडला.सुरज दत्ता खंडागळे (वय २०, रा. उळे, ता. द. सौलापूर) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.याबाबत तरुणाचे वडील दत्ता लक्ष्मण खंडागळे (वय ५४) यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे.


याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,दि.३ आँक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता हगलूर शिवारातील हत्ती पेट्रोलपंपाजवळील दस्तगीर शेख यांच्या हॉटेलजवळून जाणाऱ्या सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील रस्त्याच्या कडेला ट्रक त्याचा क्रमांक टी.एन.५२,एल ३५६९ चा चालक कुमार आरूमुगम नाडर (रा.तामिळनाडू) याने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून दुचाकीला जोरदार धडक दिली.या धडकेत सुरज हा गंभीर जखमी झाला आहे.मोटारसायकलला धडक देऊन अपघाताची माहिती न देता पळून गेल्याप्रकरणी ट्रकचालक कुमार आरुमुगम नाडर (वय ३५,रा.तामिळनाडू,तिरुपूर) याच्याविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस हवालदार लोखंडे हे करीत असल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments