Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

गुंजेगाव येथे तोल जाऊन इलेक्ट्रिक मोटारीवर पडल्याने विजेचा शाॅक लागून इसम जखमी



दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथे घराच्या पायऱ्यावरून उतरताना तोल जाऊन चालू इलेक्ट्रिक मोटारीवर पडल्याने शफी अहमद मुजावर (वय ५८) यांना विजेचा धक्का बसला.मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.जखमी शफी मुजावर हे मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घराच्या पायऱ्या उतरून खाली येत होते.या दरम्यान त्यांचा तोल गेल्याने पाय घसरून खाली पडले.नेमके त्याचेवळी खाली इलेक्ट्रिक मोटार सुरु होती.यामुळे वायरमधील विजेचा धक्का बसल्याने त्यांना कंदलगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.तेथून बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मुलगा जिलानी मुजावर यांनी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.रुग्णशुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments