Advertisement

Breaking News
Loading...

वादग्रस्त यल्लालिंग महाराजांची अखेर जामिनावर मुक्तता

दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी मठ येथील यल्लालिंग गुरुनाथ होनमाने महाराज यांची जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.मागील दोन महिन्यांपासून यल्लालिंग महाराज हे सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये बंदिस्त होते.अखेर त्यांना जामीन झाल्याने चाहत्यांनी जल्लोष केला.


थोडक्यात हकीकत अशी की,श्री प्रभू यल्लालिंग महाराज कल्याण पिठाची जमीन बनावट दस्त तयार करून विकल्या प्रकरणी 420 चा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती...


यात आरोपीतर्फे एडवोकेट कबीर आवटी,एडवोकेट हजरत अली बडेखान,एडवोकेट दत्तात्रेय कापुरे,एडवोकेट कपिल चलवादी यांनी काम पाहिले.


यासंदर्भात एडवोकेट कबीर आवटी यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments