Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मोटरसायकल चोरीतील आरोपींसह चार मोटरसायकली जप्त; कामती पोलीसांची कामगिरी



दि.१६ आँक्टोबर २०२३रोजी मोहोळ तालुक्यातील कुरूल ते अंकोली रोडलगत असणारे माळावर झुडपात कांही इसम हे मोटारसायकल सहीत थांबलेले असून ते त्यांच्याकडे कुरूल येथुन चोरील गेलेली मोटार सायकल असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने डी बी पथकाने सदर ठिकाणी जावुन छापा कारवाई केली असता नामदेव बबन चुनाडे, रा.अनिल नगर,पंढरपूर हा आरोपी मिळुन आला व दुसरा आरोपी वैजिनाथ प्रल्हाद खांडेकर,वय -२५ वर्षे,रा.अनिल नगर,ता.पंढरपूर हा त्याठिकाणाहून पळुन गेला.सदर ठिकाणी २,५०,०००/- रू किंमतीचे चार मोटारसायकल मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत.


सध्या आरोपी नामे वैजिनाथ खांडेकर हा पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून गुन्हयाचा तपास सहा.पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे हे करीत असल्याची माहिती गुरुवारी प्रेसनोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.


सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अपर पोलीस अधिक्षक हिंम्मत जाधव,उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोफौ सर्जेराव बोबडे,पोकॉ अनुप दळवी,पोकॉ राहूल दोरकर,पोकॉ हरीष थोरात,पोकॉ महादेव काकडे-सायबर शाखा यांनी पार पाडली.

 दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments