Advertisement

Breaking News
Loading...

अज्ञात कारणावरून एनटीपीसी परिसरात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या...



 

फताटेवाडी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | अज्ञात कारणावरून एनटीपीसी परिसरात एका 43 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मृताचे नाव सुनील चनबसप्पा कोठाणे (वय 43, रा. होटगी, ता. दक्षिण सोलापूर) असे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि दोन भाऊ असा परिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

या घटनेबाबतची अधिक माहिती मिळताच प्रसिद्ध करण्यात येईल.


Post a Comment

0 Comments