Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनगोळी ग्रामपंचायत सदस्या अस्मिता घंटे यांनी मराठा,कोळी आणि धनगर आरक्षणाकरीता तहसिलदारांकडे दिला पदाचा राजीनामा

 मनगोळी ग्रामपंचायत सदस्या अस्मिता घंटे यांनी मराठा,कोळी आणि धनगर आरक्षणाकरीता तहसिलदारांकडे दिला पदाचा राजीनामा




दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत विद्यमान सदस्या अस्मिता घंटे यांनी मराठा,कोळी आणि धनगर आरक्षणाकरीता आपल्या पदाचा राजीनामा दिला.


महाराष्ट्रात मराठा,कोळी तसेच धनगर समाज आरक्षण करिता आंदोलन चालू आहे.सदर आंदोलनाचा विषय मोठ्या प्रमाणात चिघळला असुन मराठा,कोळी व धनगर समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून ग्रामपंचाय सदस्य पदाच्या राजीनाम्याचे पत्र दक्षिणचे निवडणुक निर्णय अधिकारी तहसिलदार किरण जमदाडे यांना दिल्याचे ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अभिमान घंटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अभिमान घंटे यांच्यासह वांगीचे सरपंच प्रतिनिधी सुरज खडाखडे,पत्रकार सागर कोळीसह अशोक कापसे,मच्छिंद्र आयवळे,अभिजीत कापसे,विष्णू भोई,सोमनिंग कोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments