Advertisement

Breaking News
Loading...

शेटफळ येथील बौद्ध समाजावरील हल्ल्याने संताप; रिपब्लिकन सेनेची तातडीने धाव...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर |शेटफळ येथे बौद्ध समाजातील नागरिकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर रिपब्लिकन सेनेने तातडीने दखल घेत सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. रिपब्लिकन सेनेचे सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांनी जखमी व अन्यायग्रस्त नागरिकांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच पीडित कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांना धीर दिला.


या घटनेतील तपास अधिकारी API नागेश म्हात्रे यांच्याशी चर्चा करून प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून पीडितांवर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन संबंधित दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आली.

घटनेमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (अॅट्रॉसिटी कायदा) तरतुदी लागू होत असल्यास त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.

दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने व योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली.

या घटनेचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, अन्यायग्रस्तांच्या पाठीशी संघटना ठामपणे उभी असल्याचे अमित कांबळे यांनी सांगितले. समाजातील कोणत्याही नागरिकावर अन्याय किंवा अत्याचार झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही. पीडितांना न्याय मिळेपर्यंत कायदेशीर व संविधानिक मार्गाने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका रिपब्लिकन सेनेने व्यक्त केली.

यावेळी रिपब्लिकन सेनेचे सोलापूर लोकसभा जिल्हा संघटक सिद्धार्थ कांबळे, शहर युवक अध्यक्ष सुबोध सोनकांबळे, शहर उपाध्यक्ष किरण जौंजट यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments