Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मंद्रुप पोलीस ठाणे येथे मंद्रुप पोलीस दिवाळी बाजूला सारून ‘कुणबी’ नोंदीच्या शोधात दंग

 मंद्रुप पोलीस ठाणे येथे मंद्रुप पोलीस दिवाळी बाजूला सारून ‘कुणबी’ नोंदीच्या शोधात दंग


सध्या सोलापूर जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.याच पार्श्वभूमीवर मंद्रूप पोलीस ठाण्यात देखील त्यांच्या कार्यक्षेत्रातील मराठा- कुणबी नोंदी शोधण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून यासाठी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी ‘विशेष कक्ष’ कार्यान्वित केली आहे.

 

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य शासनाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे.या समितीने सर्वच कार्यालयांमधील जुन्या कागदपत्रांची पडताळणी करून ‘कुणबी’ नोंदीचा अहवाल मागविला आहे.त्यामुळे मंद्रूप पोलीस ठाण्यातील कर्मचारी दिवाळीच्या पर्वावर सुट्टीवर न जाता या दाखल्यांचा शोध घेण्यात दंग असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे.


‘कुणबी’ इतिहास शोधण्यासाठी सर्वच कार्यालयांतील कर्मचारी सध्या जुन्या फाईलींचा गठ्ठा घेऊन तपासणी करण्याच्या कामात गुंतले आहेत.यातच मंद्रूपचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रूप पोलीस ठाण्यातील सन १९०७ या कालावधीपासूनचे गोपनीय रजिस्टर,गाव-वारी रजिस्टर तसेच ३८ गावांचा जुन्या गुन्हे अभिलेखांची तपासणी युद्धपातळीवर केली जात आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments