Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

वळसंग येथे श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात संपन्न

 वळसंग येथे श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती उत्साहात संपन्न


दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी प्राचार्य विरेश थळंगे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक शिवानंद घोडके,टाटा सोलार पाॅवर सिस्टिमचे अजय मौर्य,स्वप्निल खोब्रागडे,विकास चौधरी,प्रियब्रत पांडे,कृष्णा गुप्ता,ओम बिश्नोई,संजय उपाध्याय यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.टाटा सोलार पाॅवरचे अधिकारी अजय मौर्य यांच्याहस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पूजनानंतर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी माहिती सांगून "तुम मुझे खून दो,मैं तुम्हे आझादी दूॅंगा",चलो दिल्ली व इतर घोषणा देण्यात आल्या.तसेच वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त टाटा सोलार पावर सिस्टिम,श्री. शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला तसेच वळसंग पोलिस स्टेशन आणि निर्भया पथकाचे महिला पोलिस कॉन्स्टेबल बिराजदार यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील प्रमुख रस्त्यांवरून प्रभातफेरी काढून 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक',वीसवर वाढवा चाळीसवर थांबवा,लवकर निघा सुरक्षित पोहचा,आपली वाहने सावकाश चालवा,आवरा वेगाला सावरा जीवाला अशाप्रकारच्या विविध घोषणा देत लोकांमध्ये जनजागृती केले.तद्नंतर अजय मौर्य व प्राचार्य वीरेश थळंगे यांनी आपल्या मनोगतात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याविषयी माहिती व वाहतुकीचे नियम उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले.


याप्रसंगी प्रशालेतील संजयकुमार धनशेट्टी,सिदधाराम भैरामडगी,बाळकृष्ण गुंड,नीलकंठ कवटगी,श्रीमंत भोसले,सिद्धारूढ हिरेमठ, गंगाधर बिराजदार यांच्यासह प्रशालेतील कर्मचारी आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तानाजी जमादार यांनी मानले.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....



Post a Comment

0 Comments