Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मंद्रूप येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दवाखान्यासमोर केले आंदोलन

 मंद्रूप येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दवाखान्यासमोर केले आंदोलन 




दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील श्रेणी क्रमांक एक दर्जा असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील सहा महिन्यांपासून डॉक्टर नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत दवाखान्यासमोर आंदोलन केले.येत्या चार दिवसांत येथे डॉक्टराची नियुक्ती न झाल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यास टाळे ठोकून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.पशुधन विकास अधिकार्‍याचे पद रिक्त असल्याने येथे उपचाराअभावी पशुधनाचे हाल होत असल्याचे शेतकरी गुरुसिद्ध कुमठाळे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.यावेळी शेतकरी गोटू बोराळे,मळसिद्ध पुजारी,सोमनाथ देशमुख,शिवशंकर देशमुख,लिंबण्णा शिंगडगाव,संजय चव्हाण,नितीन खरात,बबलू कुमठाळे,बिरू व्हनमाने,आप्पासाहेब साठे,सोमलिंग शिंगडगाव,चम्मा लिगेवान,अभिषेक चव्हाण,शुभम व्हनमाने,किरण दोडके,मळसिद्ध केशवे,बापू साठे,गुरूसिद्ध कुमठाळे.शिवशंकर पुजारी,ओंकार देशमुख,अमोगसिद्ध टेळे,औदुसिद्ध पुजारी,अभिषेक साठे,श्रीशैल हंजगे,कल्लप्पा घाले यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येंने उपस्थित होते.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments