Advertisement

महाराष्ट्रातील नंबर वन" हैलो रिपोर्टर न्युज पोर्टल शहरं मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मध्य प्रदेश येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मंद्रूपच्या तनुजा पवार हिने रौप्य पदक पटकावले

 मध्य प्रदेश येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत मंद्रूपच्या तनुजा पवार हिने रौप्य पदक पटकावले


मध्य प्रदेश राज्यातील बैतूल येथे झालेल्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत मंद्रूप येथील दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमीची खेळाडू तनुजा नंदकुमार पवार हिने ५५ किलो खालील गटात रौप्य पदक पटकावले.

या स्पर्धेमध्ये विविध राज्यांनी भाग घेतला होता.या राष्ट्रीय स्पर्धेत दक्षिण सोलापूर तायक्वांदो अकॅडमी मंद्रूपची खेळाडू व लोकसेवा विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय येथील इयत्ता अकरावी मधील विज्ञान शाखेत शिकत असलेली विद्यार्थीनी तनुजा पवारने रौप्य पदक पटकवत ग्रामीण भागातील मुलींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.या यशामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.यशस्वी खेळाडूंला दक्षिण सोलापूर तायक्वांडो अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक शिवराज मुगळे यांचे मार्गदर्शन लाभले.



तायक्वांदो असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष आमदार शहाजी बापू पाटील,तायक्वांदो महाराष्ट्राचे महासचिव संदीप ओंबासे,गफार पठाण,मंद्रूप पोलीस ठाण्याचेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले,लोकसेवा विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक बसवराज कुमठेकर,क्रीडाशिक्षक श्रीधर टेळे,शिवपुत्र म्हेत्रे,प्रमोद दौंडे,नेताजी पवार,प्रवीण जोडमोटे ,महिला प्रशिक्षिका रेश्मा राठोड यांनी अभिनंदन केले आहे.

दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी सागर कोळी यांनी....

Post a Comment

0 Comments